breaking-newsआंतरराष्टीय
अमेरिकेने घातले 14 इस्रायली कंपन्यांवर निर्बंध
वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायलच्या 14 कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत. या सर्व कंपन्या इस्रायलमधील एका अब्जाधीशाशी संबंधित आहेत. मानवाधिकार उल्लंघन आंणि भ्रष्टाचार यासाठी संबंधित डॅन गेर्टलर नावाच्या इस्रायली अब्जाधिशाशी संबंधित 14 कंपन्यांवर निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
डॅन गेर्टलर यांच्यावर कांगोमधील खाणी आणि तेलकरारांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अमेरिकन अर्थ मंत्रलयाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकन क्षेत्रात असलेल्या या कंपन्यांची सर्व संपत्ती गोठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कंपन्यांना कोणाही अमेरिकन नागरिक वा कंपनीशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही, अमेरिकन अर्थ मंत्रालयाने डॅन गेर्टलर यांना मागील वर्षी “ब्लॅकलिस्ट’ मध्ये टाकले होते.