breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरेलू कामगारांना कामावर घ्यावे व टाळेबंदीतील पगार द्यावा यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाची पत्राद्वारे मागणी

  • कष्टकरी संघर्ष महासंघाचा उपक्रम
  • घरेलू कामगार करनार मालकांकडे मागणी

पिंपरी | करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे असंघटित कामगारानवर झालेला परिणाम दूर करण्यासाठी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी म्हणून अनेकांच्या हाताला काम मिळावे यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ प्रयत्नशील आहे.  त्यातूनच गेल्या तीन महिन्यापासून घरेलू कामगारांना काम नाही अनेक ठिकाणी पगार नाही अशी स्थिती आहे तर त्या घर मालकाने , मालकिणीने  ताळेबंदी तील पगार द्यावा आणी कामावर घ्यावे  अशा आशयाचे पत्रक आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे हे घरेलू कामगार ( मोलकरीण ) यांना देऊन उपक्रमास सुरुवात करण्यात आली .हे पत्र ते जेथे कांम करतात त्या मालकाना देण्यात येणार आहे.

या  पत्रकावर जेष्ठ नेत्या मेधा पाटकर , कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,  नगरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार यांच्या स्वाक्षरी आहेत. 

यावेळी  वंदना चव्हाण , राणी माने, सरस्वती प्रधान ,सुप्रिया साळवे, दीपाली कांबळे, सीमा रोकडे, महानंदा शिंदे, संगीता कदम, सोनाली जाधव ,अंजना ताटे, अशा खरात आदिसह घरेलू कामगार उपस्थित होते.

करोना महमारी मुळे अनेक दिवसापासून लॉक डाऊन  केल्यामुळे असंघटित वर्गावर  जो परिणाम झालेला आहे तो अत्यंत वेदनादायी आहे.   ही परिस्थिती सुधारली पाहिजे घरेलू कामगारांना काम मिळाले पाहिजे आणि त्यांना केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार यांचा टाळेबंद  च्या काळातील पगार मिळणे अपेक्षित आहे.या कालावधीमध्ये अनेक घरेलू कामगार ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या मालकांनी   आणी सोसायटी सदस्यानी अनेक महिलांना पगार दिलेला आहे, मात्र अनेक ठिकाणचा पगार मिळालेला नाही तर अशा महिलांनी  मागणी करून सामाजिक जाणिवेतून  त्या मूळ मालकाकडून पगार द्यावे अशा प्रकारचे पत्राद्वारे विनंती अर्ज सादर करण्यात आलेले आहेत आणि या सोसायटीमध्ये निर्बंध घालण्यात आलेल्या सोसायटी धारक त्या सोसायटी धारकांना अशी विनंती करण्यात येत आहे की योग्य  निकष लावून ,फिजिकल  डिस्टन्स ने  त्यांना काम करायला सुरुवात करण्यात यावी.   

म्हणून याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी यांनी सुद्धा ही एक पत्र काढलेला आहे की घरेलू कामगार कामावर बंद करण्याचा निर्णय हा सोसायटीचा आहे. शासनाचे  त्याला समर्थन नाही . याचा विचार करून सोसायटी धारकाने प्रत्येक सोसायटीतील ज्यांच्याकडे या महिला काम करतात त्यांना काम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी यामध्ये कंटेंमेंट झोन मध्ये राहणाऱ्या महिला  यांना वगळून इतर ठिकाणी ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र नाही अशा ठिकाणच्या महिलांना कामावरती घेण्यात यावे त्यांचे पगार सुरू करण्यात यावे या आशयाचे  पत्र आज चिंचवड येथे झालेल्या उपक्रमा पासून सुरुवात झालेली आहे. 

महासंघातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की या कसोटीच्या काळामध्ये फार मोठा परिणाम झाला असून त्यांना अनेक शासकीय, निमशासकीय अनेक महिला भगिनी पुरुष यांना घरी बसून सुद्धा काम मिळत आहे. मात्र घरेलू कामगार याना काय खायचे कसे जगायचे असा प्रश्न आहे  याचा विचार करून त्यांनी या कष्टकरी महिलांना पगार न कापता  त्यांना पूर्ण पगार द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button