TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे १५०० सायकलस्वारांची ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकल वारी उत्साहात

पिंपरी : संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रा मध्ये काम करणारे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे शनिवारी ३ जून रोजी देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान करण्यात आले. यंदाचे वर्ष सदर सायकल वारीचे सहाव्या वर्षापासून यावर्षी तब्बल अकराशेहून अधिक सायकल भक्तांचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशी निमित्त ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आले होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, प्रदीप टाके, वैद्यनाथ हॉस्पिटल औरंगाबादचे डॉक्टर संदीप सानप, अनिल सानप, उद्योजक अण्णा बिरादार यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आले. इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

सदर वारीचे सातवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व 1500 हून अधिक सभासद एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर 3 जून रोजी करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करण्यात आली असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे यांच्या तर्फे सांगण्यात आले.
सायकल वारीच्या वाटेवर भिगवण सायकलिस्ट, इंदापूर साईकलिस्ट, पंढरपूर सायकलिस्ट, शहा अँड ब्रदर्स यांची मदत झाली.

सायकल वारी मार्ग-
देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवन – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला.

सदर सायकल वारीच्या नियोजनामध्ये पंढरपूर येथील सुविधांसाठी उद्योजक ज्ञानेश कटकमवार, मंदिर समिती आणि भक्तनिवास यांचे विशेष आभार. इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या जम्बो प्लानिंग टीमचं सहभाग आहे. यामध्ये गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी, अमित पवार, अजीत गोरे, रमेश माने, सुशील मोरे, अविनाश चौघुले, श्रेयस पाटील, प्रतीक पवार, मारुती विधाते, प्रशांत तायडे,‌‌ रोहित जयसिंघनी, योगेश तावरे, माधवन स्वामी, प्रमोद चिंचवडे, अविनाश अनुशे, मदन शिंदे, शंकर उननेचा, अभी कासार, नितीन पवार, दीपक नाईक, कपिल पाटील, सुजित मेनन, मनोज चोपडे, संतोष नखाते, अमित नखाते, प्रणय कडू, विवेक कडू, आनंदा पवार, रघुनाथ शितोळे, कैलास तापकीर, सुधाकर टिळेकर, विद्या, अँसि यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button