breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘काही उमेदवार मुक्ता ताईंच्या मराणाची वाट बघत होते’; काँग्रेसचा आरोप

मुक्ता ताईंनी तरतूद केली होती, तीच काम थांबवण्याचं काम हेमंत रासनी केलं

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. अनेक स्थानिक नेते विरोधी पक्षाच्या नेत्यावर टीक करताना दिसत आहेत. यातच काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांच्यावर जहरी टीका केली आहे.

एका चित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पारितोषिक मिळालं. ते चित्र होतं साऊथ आफ्रिकेमधील, उपासमारीमुळे एक लहान मुलगा मरत होता आणि गिधाड त्याच्या बाजूला बसलं होतं. गिधाड वाट पाहत होतं की, लहान मुलगा कधी मरेल आणि मी कधी त्याला खातो. या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा संदेश याच्या साठी देत आहे की, मुक्ताताई अडीच वर्षे आजारी असताना अनेक जण भेटायला जात होती. पण त्याचे काही उमेदवार त्यांच्या मराणाची वाट बघत होते, असा आरोप काँग्रेस नेते उरविंदे शिंदे यांनी केला आहे.

मुक्ता टिळक यांनी तरतूद केली होती, तीच काम थांबवण्याचं काम हेमंत रासने करत होता. हे मी नाही सांगत तर मुक्ता टिळकांचे मिस्टर शैलेश टिळक यांनी देवेंद्र फडणवीसला यांना सांगितले. असा उमेदवार तुम्ही देत आहेत. ज्याने ताईच्या मराण्याची वाट पाहिली, असं शैलेश टिळक म्हटल्याचा दावा अरविंद शिंदे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button