breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

11 वाजेपर्यंत मावळ मतदारसंघात १८ टक्के, तर शिरूर मतदारसंघात १६ टक्के मतदान

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. सकाळी सात ते अकरा या चार तासात मावळ लोकसभा मतदारसंघात १८ टक्के, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात १६ टक्के मतदान झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ या तीन विधानसभा मतदारसंघांचा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा, पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचा तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर आणि जुन्नर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

या दोन्ही लोकसभा मतदारसंघात खासदार निवडून देण्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कडक उन्हामुळे सकाळी मतदानासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी सात ते अकरा या चार तासांत मावळ लोकसभा मतदारसंघात १८ टक्के आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात १६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button