breaking-newsमनोरंजन

“उरी’ देणार सर्जिकल स्ट्राईकची अनुभुती

2019मध्ये प्रदर्शित होणा-या बीग बजेट चित्रपटांपैकी एक “उरी’ चित्रपटात भारतीय जवानांनी केलेली कर्तबगारी सर्वाना उत्साहित करणारी ठरणार आहे. सर्जिकल स्ट्राइकवर आधारित असलेल्या या चित्रपटात वास्तविकता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हॉलीवूडमधील “झिरो डार्क थर्टी’प्रमाणेच “उरी’ चित्रपट प्रेक्षकांना अनुभव देणारा ठरेल.
भारत-पाक सीमेवर 2016मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.

आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या “उरी’ चित्रपटात पाकिस्तानच्या हद्‌दीतील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय जवानांनी केलेली यशस्वी कामगिरी दाखविण्यात आली आहे. भारतीय जवानांनी इतिहासात पहिल्यांदाच शत्रु राष्ट्रावर हल्ला करत त्याला चोख प्रत्तुत्यर दिले होते.

भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच अमेरिकाने 2011मध्ये ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. 2011च्या या अमेरिकी हल्ल्याला उजाळा देणा-या “झिरो डार्क थर्टी’ चित्रपटाची जगभरात स्तुती झाली होती.
आरएसव्हीपी मूव्हीजद्वारा निर्मित आणि आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात विक्‍की कौशल, यामी गौतम आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका साकारत आहेत. “उरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button