breaking-newsराष्ट्रिय

१६ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळे सुरू होणार

श्रीनगर – जवळपास ५ महिन्यांनंतर आता १६ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळे सुरू केली जाणार आहेत. मात्र मिरवणूक आणि धार्मिक आयोजनांवर अजूनही बंदी कायम असणार आहे. सरकारकडून या संदर्भात अधिक विस्तृतपणे सूचना लकवरच जारी केल्या जातील.

यासोबतच जिम आणि योग केंद्रे सुरू करण्यासदेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी त्यांना एसओपीचे पालन करावे लागणार आहे. सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. या नियमांचे पालन आजपासूनच करावे लागणार आहे.

नवीन नियमानुसार सिनेमा हॉल, बार, स्विमिंग पूल, शाळा, कॉलेज अजूनही बंदच असणार आहेत. आंतरराज्यीय किंवा आंतरसंभागीय वाहतूक सेवादेखील बंद ठेवली जाणार आहे. मात्र ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंतरजनपदीय वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पहिल्याप्रमाणेच नियम पाळावे लागणार आहेत. ट्रेन किंवा विमानाने येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जाईल तर रस्ते प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button