breaking-newsमनोरंजन

प्रसिद्ध दाक्षिणात्य पार्श्वगायक बालसुब्रमण्यम यांना कोरोना

नवी दिल्ली – प्रसिद्ध दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. बालसुब्रमण्यम यांनीच स्वतः फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. त्यासोबत त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.

बालसुब्रमण्यम यांनी केलेल्या सोशल मीडियावरील व्हिडीओत म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जाते. त्यांनी जवळपास 40 हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button