क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

मनिकाला न्याय; टेबल टेनिस महासंघावर प्रशासकाची नियुक्ती

नवी दिल्ली | आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बात्राच्या लढय़ाला अखेर न्याय मिळाला आहे. विश्वासार्हता गमावल्याचा ठपका ठेवत भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या कार्यकारिणीला निलंबित करीत प्रशासक नेमण्याचे निर्देश शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त बात्राने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी हा निर्णय दिला आहे. मनिकाने दाखल केलेल्या सामनानिश्चितीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सामनानिश्चिती करण्याची सूचना देणाऱ्या प्रशिक्षकाला संघटना पाठीशी घालत असल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

‘‘क्रीडापटू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संघटनेचे आहे. ज्या व्यक्तींना खेळाडूंना कशी वागणूक द्यावी हे कळत नाही, त्यांनी बाहेर जाणेच योग्य ठरेल,’’ असे न्यायमूर्ती पल्ली यांनी निकालात म्हटले आहे. या निकालपत्रात न्यायामूर्तीनी प्रशासकाचे नावही नमूद केले आहे.
गतवर्षी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न देण्यात आलेल्या मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रौय यांच्यावर आरोप करीत न्यायालयात धाव घेतली होती. रॉय यांनी त्यांच्याकडे खासगी प्रशिक्षण घेणाऱ्या एका खेळाडूसाठी मनिकाला ऑलिम्पिक पात्रता लढत गमावण्याची सूचना केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button