breaking-newsराष्ट्रिय

गुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू

अहमदाबाद – देशभरात कोरोनाचे संकट असतानाच गुजरातमध्ये आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. अहमदाबादमध्ये कोविड रुग्णालयात भीषण स्वरूपाची आग लागल्याची घटना आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत ८ कोरोनाग्रस्तांचा तडफडत होरपळून मृत्यू झाला. आगीने रौद्र रुप धारण केल्याने रुग्णालयात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अन्य ४० कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचवून त्यांना दुसरीकडे हलवले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अहमदाबाद येथील नवरंगपुरा परिसरातील श्रेय रुग्णालयात ही भीषण आगीची घटना घडली. या आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे या आगीत होरपळून आयसीयूमधील ८ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. तर सुदैवाने अन्य ४० रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्रेय रुग्णालय हे कोविड-19 रुग्णांसाठी करण्यात आले होते. या रुग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम काही रुग्णांना सुखरुप बाहेर काढून आग विझविण्यास सुरुवात केली. तरीही आयसीयूमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ८ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या आगीतून बचावलेल्या ४० कोरोना रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अहमदाबादचे महापौर बीजलबेन पटेल यांनीही तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button