breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्र्यांचा आज पुणे दौरा…
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले आहेत. साडेअकरा वाजेपर्यंत ते पुण्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासह उपस्थित असतील.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात जाऊन पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.