breaking-newsTOP Newsपुणे

नाट्यसमीक्षक डॉ. मधुरा कोरान्ने यांचं कोरोनामुळे निधन

पुणे – नाट्यसमीक्षक, प्राध्यापक डॉ. मधुरा कोरान्ने यांचं कोरोनामुळे निधन झालं. डॉ. मधुरा कोरान्ने यांनी नाटकांवर अनेक समीक्षणं आणि पुस्तक लिहिली आहेत. त्या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिकाही होत्या. डॉ. मधुरा यांची प्रकृती खालवली. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या त्यावेळी त्यांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे.

मधुरभाष, बोलता…बोलता… (नाट्यविषयक मुलाखती), काव्यललित (काव्यसंग्रह), नाट्याक्षरे, स्त्री नाटककारांची नाटके, न्यायालय आणि मराठी नाटक, नाट्यगंध, मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा, एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप, मनमोहिनी, शब्दललित, स्त्री समस्या आणि आजचे नाटक, स्री-नाटककारांची नाटके ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय त्यांना नाट्यसमीक्षणासाठी माधव मनोहर पुरस्कारही मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button