breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानमध्ये सीएसह काहींची 184 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – तब्बल 1 हजार कोटी रूपयांची बॅंक घोटाळ्याबद्दल राजस्थानस्थित एका चार्टर्ड अकाऊंटंटसह (सीए) काही जणांची 184 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली. याआधी डिसेंबर 2016 मध्ये शंभर कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत 302 कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे.

संबंधित घोटाळा सिंडीकेट बॅंकेच्या राजस्थानमधील तीन शाखांमध्ये 2011 ते 2016 या कालावधीत घडला. याप्रकरणी नव्याने जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये हॉटेल, रिअल इस्टेट प्रोजेक्‍ट आणि काही जमिनींचा समावेश आहे. संबंधित सीए आणि एक बॅंक मॅनेजर घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button