सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी – सुरेश प्रभू
मुंबई : सेवा क्षेत्रामध्ये भारत जागतिक केंद्र होण्यासाठी राज्यनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने यात आघाडी घेत जागतिक प्रदर्शनाचा सहभागी राज्य झाले आहे. आपल्या देशातील असलेल्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
यावेळी वित्त, पर्यटन, लॉजिस्टिक सेवा, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सेवा, आरोग्य सुविधा सेवा, बांधकाम आणि अभियांत्रिकी सेवा क्षेत्र, कायदेविषयक सेवा, पर्यावरण विषयक सेवा, वाणिज्यविषयक सेवा, शैक्षणिक सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार सेवा व पायाभूत सुविधा सेवा या 12 सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची निवड करण्यात आली असून त्यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.