breaking-newsमहाराष्ट्र
भाजपाचीसुद्धा वेळ येणार -राज ठाकरे
बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपा नेते बीएस येडियुरप्पा आणि जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे आता कर्नाटकात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसनं राज्यपालांवर पक्षपातीपणा करत असल्याचा थेट आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे. कर्नाटकचे राज्यपाल भाजपाच्याच बाजूने जाणार असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ”सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करू नये. भाजपाचीसुद्धा वेळ येणार आहे. सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार”,असेही ते म्हणालेत.