breaking-newsआरोग्य

#Coronavirus: रंगपंचमी खेळताय…मग,अशी घ्या काळजी

चीनमधून पसरलेला करोना व्हायरस हळूहळू जगभरात अन्य देशांत पसरला. भारतातही काही ठिकाणी लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अनेक नेत्यांनी या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सामील न होण्याची घोषणा केली आहे. अनेक सेलिब्रिटीही यापासून लांब राहणं पसंत करत आहेत. होळीचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवाय गर्दीची ठिकाणं टाळा असं आवाहन सरकारकडूनही करण्यात येत आहे. कारण जास्त माणसं एकत्र जमतील त्या ठिकाणी कोणताही संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. त्यात कोरोना मुळे ही भीती जास्तचं वाढली आहे…रंगपंचमी खेळताना ओलेचिंब होताना, लोकांना भेटताना, लोकांना रंग लावताना काय काळजी घ्यायची आहे…

कोरोना व्हायरस पसरण्याचा सर्वाधिक धोका गर्दीच्या ठिकाणी असतो, कारण अशा गर्दीच्या ठिकाणी एक जरी करोना संक्रमित व्यक्ती असली तर ती सर्दी-खोकल्यावाटे या विषाणूचा फैलाव करू शकते. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळाव. जर अशा कुठल्या ठिकाणी जावंच लागलं तर मास्कचा जरूर वापर करावा आणि तो मास्क तोंडावरून हटणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून संक्रमणापासून आपला बचाव होईल.

कुठेही गेलात तरी एका लहानशा बाटलीत का होईना, पण सॅनिटायझर सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला काही खायचं असेल तेव्हा तुम्हाला सॅनिटायझरची आवश्यकता भासेल. आधी सॅनिटायझरने आपले हात जर्मफ्री करा आणि मगच खाण्याच्या वस्तूंना हात लावा. जेवणानंतरही हातांना सॅनिटायझर लावायला विसरू नये.

होळी, धुळवडीच्या सणाला खूप गळाभेटी घेतल्या जातात. लोक एकमेकांना रंग चोपडत असतात. म्हणूनच कोणाची तरी गळाभेट घ्याल आणि तुम्हाला संक्रमण होईल असं नको व्हायला. ज्यांना सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसत आहेत, केवळ अशाच लोकांपासून लांब राहण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. करोना व्हायरसची लक्षणे सर्दी-तापाच्या लक्षणांसारखीच आहेत. त्यामुळे जेथे आजूबाजूला ही लक्षणे दिसली तेथे थोडं सावध झालेलं केव्हाही चांगलंच…

Indian People Celebrating Holi Festival, Jaipur, India

जर तुम्हालाही सर्दी किंवा खोकला असेल तर त्याकडेही लक्ष देण गरजेच आहे. शिंकताना समोर थेट हात वापरण्याऐवजी रुमाल वापरा, मास्क लावा, जेणेकरून तुमचं संक्रमणदेखील इतर कोणाकडे पसरणार नाही. एखाद वेळ नेमका सोबत रुमाल नसेल तर शिंकताना थेट हात तोंडावर धरण्यापेक्षा हाताचं कोपर समोर धरा. पण सर्दी-खोकला असेल तर कायम न विसरता रुमाल जवळ बाळगायलाच हवा.

घरी मुलांना कोरोना व्हायरसच्या लक्षणांबद्दलची योग्य माहिती द्या. कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हे त्यांना समजवा. त्यांना हेही सांगा की त्यांनी कसे इतर सर्दी-खोकला झालेल्या मुलांपासून अंतर ठेवावे. मुलांना सॅनिटायझर, माउथ मास्क अशा वस्तूही द्या आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा हेही सांगा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button