breaking-newsराष्ट्रिय

सहकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी लष्करातील मेजर ताब्यात

नवी दिल्ली – सहकाऱ्याच्या पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मीरत येथील लष्कराच्या एका मेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. पश्‍च्म दिल्लीत ही हत्या केल्याचा हा आरोप या मेजरवर आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित मेजरला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हत्या झालेल्या महिलेचा गळा चिरलेला मृतदेह पश्‍चिम दिल्लीतील कॅन्टोन्मेंट भागातल्या ब्रार चौकामध्ये काल आढळून आला होता. या महिलेचा मृत्यू अपघातामध्ये झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र मात्र मृतदेहाची तपासणी केली असता तिचा गळा चिरल्याचे आढळून आले होते. ताब्यात घेतलेल्या मेजरने या महिलेच्या चेहऱ्यावरून कार नेली आणि अपघात झाला असल्याचे भासवल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले. या महिलेला तिच्या पतीच्या सरकारी वाहनातून सरकारी चालकाने लष्कराच्या रुग्णालयात फिजीओथेरपीच्या ट्रीटमेंटसाठी नेले होते. मात्र तिला नेण्यासाठी हा चालक परत आला तेंव्हा तिचा ठावठिकाणा नव्हता. नियोजित वेळापत्रकानुसार ही महिला फिजीओथेरपीसाठी थांबलीच नव्हती, असे लक्षात आले होते. तिचा मृतदेह रात्री उशीरा सापडला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button