breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्तेतून धनसंपत्ती मिळवणे हे राज्य सरकारचे समिकरण – बाबा कांबळे

पिंपरी / महाईन्यूज

रिक्षा चालक मालकांचे जग कोरोनानंतर बदलले आहे. त्यांना आपला व्यवसाय टिकून जगण्याची लढाई करावी लागत आहे. सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी होण्याची प्रक्रिया खंडित होत असून सत्तेच्या माध्यमातून धनसंपत्ती मिळवणे हा एकमेव उद्देश समोर ठेऊन राजकीय समीकरण तयात केले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे.

या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य घटक रिक्षाचालक दुर्लक्षित होत असून राज्यकर्त्यांच्या उदासीन कारभारामुळे रिक्षाचालकांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवणे ही काळाची गरज आहे, असे ही मत बाबा कांबळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे सलग्न रहाटणी फाटा येथील रिक्षा स्टँड उदघाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अजय लोंढे, भारत मरपगारे, भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, युवराज भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी तुषार सूर्यवंशी, पिंटू यादव, प्रमोद सूर्यवंशी, सुहास कटारे, प्रशांत निकाळजे, अमीर शेख, अरुण भोरे, शांताराम बैसणे, आशोक तावडे, ज्ञानेश्वर येमले, दशरथ कांबळे, सुभाष यादव, भास्कर कवडे, प्रदिप सुर्यवंशी, दत्ता कांबळे, कयुम शेख यांनी परिश्रम  घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button