breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपला मुंबई पोलिसांचा दणका, रॅलीला परवानगी नाकारली

मुंबई | CAA आणि NRCच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या भाजपच्या संविधान सन्मान रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेमुळे ही परवानगी नाकारली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कालच्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरी देखील वंचितच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दादरमध्ये एकत्र जमले होते. आता ठाकरे सरकार काँग्रेसच्या मोर्चाला परवानगी देणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपच्या संविधान सन्मान रॅलीला ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव इथल्या टिळक पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात येणार होती. मात्र, मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांमुळे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता ऑगस्ट क्रांती मैदानातच सभा होणारे आहे. भाजप नेत्यांचे एक प्रतिनिधी मंडळ गिरगाव चौपाटी इथल्या टिळक पुतळ्याला अभिवादन करण्यास जातील. त्याआधी नागपूर येथे भाजपकडून मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button