breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बडे मासे गळाला लागणार !

  • शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांची पत्रकार परिषदेत माहिती
  • भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा दिला इशारा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यात सत्ताधारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे हात बरबटलेले आहेत. या भ्रष्टाचाराच्या पैशाचे नियोजन करून देण्यात संघाच्या पठडीत प्रशिक्षण घेऊन आलेले आयुक्त यांनी चोख भूमिका बजावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी माजी आमदार ए़ड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या (Selection of SYSTEM INTEGRATOR for Supply, Installation, Testing, Comissioning and O & M for ICTled PCSCL Smart City Solutions) ५२० कोटींच्या निविदेद्वारे SYSTEM INTEGRATOR म्हणून Tech Mahindra Co. Ltd, Krystal Integrated Services Pvt. Ltd., Arceus Infotech Pvt. Ltd या Consortiurn ची Lead Bidders म्हणून निवड करण्यात आली. १५ मे २०१५ रोजी या Consortium बरोबर PCSCL (पिं. चिं. स्मार्ट गिटी लि) SYSTEM INTEGRATOR म्हणून ५३० कोटींचे कामांचे Master Service Agreements (MSA) केले आहे. या SYSTEM INTEGRATOR द्वारे करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून PCSCL (पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड)ची किमान २५० कोटी रुपयांची फसवणूक या प्रकल्पाद्वारे होणार आहे. या निविदेमधील एक भाग असलेला Field Infrastructure : Advance Water Metering Application या हेडर खाली झालेला भ्रष्टाचार झालेला आहे. MSA मध्ये Field Infrastructure : Advance Water Metering Application या हेडर खाली SYSTEM INTEGRATOR ने वरील कामांसाठी PCSCLT ९.७० कोटी (टॅक्रासह) खर्च दाखविला आहे.

या कामासाठी SYSTEM INTEGRATOR द्वारे अधिकृत पुरवठादार म्हणून Adept Fluidyne Pvt . Ltd. या कंपनीचा समावेश केला होता. या कंपनीने वरील कामासाठी SYSTEM INTEGRATOR ला ४.४० कोटी (टॅक्ससह) खर्चाचे Quotation दिले आहे. या टेंडरचे काम सुरु झाल्यानंतर SYSTEM INTEGRATOR ने MSA च्या नियमांचा भग करून PCSCL ची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या LIVE FIBRE PVT. LTD. या कंपनीला Sub Contractor म्हणून नेमले आहे. या कंपनीने Adept Fluidyne Pvt. Ltd. ला वरील कामाच अंदाजे २ कोटी ५३ लाख (टॅक्ससह) Purchase order ऑफर दिली आहे.

PCSCL कडून MSA मध्ये ज्या कामाचे ९.७० कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. ते काम SYSTEM INTEGRATOR आणि त्याचा Sub Contractor अधिकृत पुरवठादार Adept Fluidyne Pvt. Ltd. यांना २ कोटी ५३ लाख (टॅक्ससह) रुपयात करण्यास भाग पाडत आहेत. या एकाच कामामध्ये ७.२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अधिकृत पुरवठादार Adept Fluidyne Pvt . Ltd. यांनी वरील Purchase Order मधील ऑफर प्रमाणे काम करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याकडून वरील काम काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी दुसरा पुरवठादार नेमण्यात आला आहे.

Smart Water आणि Smart Sewerage या कामांचा Scope अंदाजे १३० कोटींचा आहे. या दोन कामांमाध्येच १०० कोटींचा अपहार असण्याची शक्यता आहे. पिं.चिं . शहराचे आयुक्त, PCSCL चे संचालक मंडळ, स्मार्ट सिटी प्रशासन आणि SYSTEM INTEGRATOR या सर्वांचा या भ्रष्टाचारात समावेश आहे. PCSCL (पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी ली.) टेंडर क्र .८ दि ० ९ / १० / २०१०, (Selection of SYSTEM INTEGRATOR for Supply, Installation, Testing, Comissioning and O & M for ICT led PCSCL Smart City Solutions) या ५20 कोटीचे टेंडर त्वरित स्थगित करण्यात यावे. निविदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button