breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकानी कोसळला

मुंबई | शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात १ हजार अंकाची मोठी घसरण झाली. शेअर बाजार सुरु होताच आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची सुरुवातच खराब झाली. सेन्सेक्स १००० अंकांनी घसरुन ३८, ६८६ वर आला.

टेक महिंद्रा, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली पहायला मिळाली. तर निफ्टी ३०० अंकांनी कोसळून ११,३३३ वर स्थिरावला. कोरोना विषाणूमुळे जगभरातील शेअर मार्केटला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम चीन सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला तर बसलाच आहे, मात्र आता याच्या जाळ्यात भारत देखील येऊ लागला आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत चित्रं पालटले.

टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, इन्फोसिस, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी कोसळला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button