breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!, मनसेची नवी ऑफर

औरंगाबाद | पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या हकालपट्टीचा चंग बांधलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी शक्कल लढवली आहे. घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना औरंगाबादमधील मनसेकडून घसघशीत बक्षीस देण्यात येणार आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले. औरंगाबादमध्ये शुक्रवारी सकाळी मनसेच्या वतीने अनेक पोस्टर्स लावण्यात आली असून त्यात अवैध बांगलादेशी नागरिक आणि पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना 5000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!, मनसेची नवी ऑफर

घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. तिथे गुप्त पद्धतीने माहिती देण्याचीही सोय असेल, असंही औरंगाबाद मनसेकडून सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button