breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा ‘मी मराठी… स्वाक्षरी मराठीचा नारा’ !

  • मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद
  • हा अनोखा उपक्रम शहरात ठरला यशस्वी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतीक मराठी राजभाषा दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने पिंपरीत मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्याला चित्रपट प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पिंपरीतील विशाल ई स्क्वेअर सेनेमा गृहासमोर हा उपक्रम घेण्यात आला.

या स्वाक्षरी मोहीम उपक्रमाचे उद्घाटन मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांच्या हस्ते झाले. मनसे चित्रपट सेनेच्या वतीने चित्रपट गृहासमोर बोर्ड लावण्या आला होता. त्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यामध्ये पांढरा बोर्ड तयार केला होता. त्यावर शहराध्यक्ष चिखले यांनी स्वाक्षरी करून उपक्रमाला चालना दिली. यासह मनसेच्या विविध संघटनांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. मनसेचा हा उपक्रम शहरात अनोखा ठरला.

यावेळी विद्यार्थी सनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्ष शहराध्यक्ष राजू भालेराव, चित्रपट सेनेचे दत्ता घुले, प्रज्ञा पाटील, तुकाराम शिंदे, शिवा दिलपाक, स्वाती बालटे, प्रसाद खैरे, दीपक भालेराव, रमेश विरनक, प्रणव आसरे, रोहन पवार, वैजिनाथ ढोपरे, सुरज लोणारी आदी यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी मराठीत स्वाक्षरी करून मराठी राजभाषा दिवस साजरा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. संबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये केवळ मराठी भाषेतून व्यवहार आणि कामकाज झाले पाहिजे, यासाठी मनसेचा टोकाचा आग्रह आहे. यातूनच मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्याला चित्रपट पहायला येणा-या शौकिनांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

झेंडा बदलल्यानंतर मनसैनिक आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलल्यानंतर अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार शहरातील मनसे कमालीची आक्रमक झाली आहे. समाजोपयोगी उपक्रम घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक मनसैनिक पेटून उठलेला दिसत आहे. पक्षाचे कार्य असेच सातत्यपूर्ण चालू राहिल्यास 2022 ला होणा-या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे जास्तीजास्त नगरसेवक निवडून आणण्यात पक्षाला नक्कीच यश मिळणार, असा अंदाज बांधला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button