breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला कार्यकारिणीला मिळेना मुहूर्त

  • सक्षम महिला कार्यकर्त्यांना लागली उत्सुकता
  • इच्छाशक्ती अभावी निवडी लांबणीवर पडण्याची शक्यता

 

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू असताना शिवसेनेचे वाघ मात्र चांगलेच गारठले आहेत. राज्याच्या सत्तेत राहूनही भाजपसोबत पंगा घेणारी शिवसेना शहर पातळीवर ढिम्म झाल्याची दिसते. त्यातच पक्षाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता महिला कार्यकारिणी जाहीर होण्याचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहेत. मात्र, याला मुहूर्तच मिळत नसल्याने महिला कार्यकारिणी लांबणीवर पडू लागली आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाबरोबरच पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे दोन खासदार आणि एक आमदार असे नेतृत्वबळ आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाचे नऊ नगरसेवक आहेत. एवढी ताकद दिमतीला असताना शहराध्यक्ष योगेश बाबर हे शहर पातळीवर पक्षाशी संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यास कचरताना दिसत आहेत. त्यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी मोठ्या थाटात जाहीर केली. मात्र, कार्यकारिणीतील पदाधिका-यांना जबाबदारीची जाणिव करून देण्यात बाबर कमी पडू लागले आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसते. त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला बण्याची शक्यता कार्यकर्ते वर्तवू लागले आहेत.

महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाला आता महिला कार्यकारिणी जाहीर करावी लागणार आहे. त्यासाठी काही महिलांच्या मुलाखती घेतल्याचे अध्यक्ष बाबर सांगत आहेत. मात्र, आजवर किती महिला कार्यकर्त्यांच्या मुलाखती झाल्या आणि किती महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत ते बालायला तयार नाहीत. त्यामुळे पक्षातील सक्षम महिलांना काम करण्याची संधी खरोखर मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिला आघाडी अध्यक्षा कोण असणार?
विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी दोन उपशहर संघटिका, प्रत्येकी एक ते दोन समन्वयक अशा पंधरा कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश राहणार आहे. यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय दहा विभागीय संघटिकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघासाठी संघटिका म्हणून प्रतीक्षा घुले, वैशाली मराठे व वेदश्री काळे यांच्या नियुक्त्या निश्चित मानल्या जात आहेत. तर, शहर संघटिका पदी सुलभा उबाळे यांचीच फेरनिवड होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, महिला आघाडीच्या अध्यक्षा कोण असणार याबाबत मात्र, अध्याप कोणी बालायला तयार नाही.

महिला कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार आहे. त्याकरिता इच्छुक महिला कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यातील सक्षम महिलांना संधी देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडी जाहीर केल्या जातील.
योगेश बाबर, शहराध्यक्ष, शिवसेना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button