breaking-newsआंतरराष्टीय

इंडियन ऑईलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा केला बंद

पैसे थकवल्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केला आहे. जेट एअरवेज आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून इंडियन ऑईलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

जेट एअरवेजला यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे अजून उत्तर मिळालेले नाही. कर्ज पूनर्रचना योजनेतंर्गत एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँकांचा समूह जेटचे व्यवस्थापन आपल्या हातात घेणार आहे. २६ विमानांचा ताफा असलेल्या जेटची उड्डाणेही मोठया प्रमाणावर कमी झाली आहेत.

२५ मार्चला एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने बनवलेल्या योजनेला जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्या अंतर्गत जेटमध्ये १५०० रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. पण जेटला अजून हे पैसे मिळालेले नाही. जेटच्या बिघडती स्थिती लक्षात घेऊन संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने संचालक मंडळाचा राजीनामा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button