ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

कुदळवाडीत पाणीपुरवठा वेळ वाढवा!

स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी

पिंपरीः कुदळवाडी परिसरात अपुरा होणारा पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने याप्रश्नी तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा वेळ वाढवावा, अशी मागणी स्वीकृत सदस्य श्री. दिनेश यादव यांनी केली आहे. याबाबत दिनेश यादव यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांना याबाबत निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात यादव यांनी म्हटले आहे की, आधीच दिवसाआड पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या नागरिकांना कमी दाबामुळे पाणी पुरवठा होत आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत. लोकवस्ती भागाचा सर्वे करुन वेळ वाढविण्यात यावा. कुदळवाडी परिसरातील पाणीपुरवठा वेळ तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे.यावेळी दिनेश यादव स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button