breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

योगामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो- एकनाथ पवार

पिंपरी –  प्रत्येक व्यक्तीचे शारिरीक व मानसिक आरोग्य सदृढ राहिल्यास तो कोणत्याही क्षेत्रात चांगले योगदान देऊ शकतो. माणसाच्या बुध्दीमत्तेत व स्मृतीमध्ये वाढ होण्यासाठी योगाभ्यासाचे विशेष महत्त्व आहे. योग ही संकल्पना मनुष्याच्या निर्मितीसाठी आहे. त्यातून माणसाचा सर्वांगीण विकास होऊन सुखशांती प्राप्त होते, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

 जागतिक योगदिनानिमित्त  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथील साईकृष्ण उद्यानामध्ये योगसाने व प्राणायामासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी योग तज्ज ऐर्श्वर्या जोशी यांनी योगासनांची प्रात्याक्षिके करून दाखविली. तसेच, उपस्थितांना योगाअभ्यासाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचा सुमारे 500 नागरिकांनी लाभ घेतला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button