breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार”-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

मुंबई | शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचे सत्र अद्यापही सुरु आहे. नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात असल्याचं स्पष्ट केलं असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावं अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. बैठकीत ५०-५० फॉर्म्युलावर चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पण, शिवसेनेचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी अधिकृतपणे कोणतंही भाष्ट केलेलं नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा पत्रकार परिषदेत केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button