breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“रूपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही”; चित्रा वाघ

उर्फी जावेदच्या प्रकरणावरून चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर आमने सामने

मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. यावरून राज्य महिला आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही, असं प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले. या पारश्वभूमीवर चित्रा वाघ यांनी थेट महिला आयोगाला लक्ष्य करीत रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबईत महिला उघडीनागडी फिरत असतांना प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असतांना दुर्लक्ष केलं गेलं.
महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली. या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं.
मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button