breaking-newsराष्ट्रिय

१८९ प्रवाशांसोबत उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेट विमानाचा टायर फुटला

जयपूर विमानतळावर स्पाईसजेटच्या विमानाचं इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं आहे. विमानात एकूण १८९ प्रवासी प्रवास करत होते. विमानाचा टायर फुटल्याने जयपूर विमानतळावर विमान उतरवत इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आलं आहे.

दुबई-जयपूर SG 58 या विमानाचं सकाळी ९ वाजता इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं. एएनआयने विमानाचं लॅडिंग होतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओत विमानाचा टायर फुटला असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Embedded video

ANI

@ANI

: SpiceJet Dubai-Jaipur SG 58 flight with 189 passengers onboard made an emergency landing at Jaipur airport at 9:03 am today after one of the tires of the aircraft burst. Passengers safely evacuated.

67 people are talking about this

गतवर्षी ९ फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना घडली होती. २०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाचं चेन्नई विमातळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं होतं. टेक ऑफ करताचा टायर फुटल्याने हे लॅडिंग करण्यात आलं होतं. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं होतं. पण लॅडिंग होताच विमानाचा दुसरा टायरही फुटला होता. सर्व १९९ प्रवासी सुखरुप होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button