breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

अलर्ट! घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

Heat Wave Guidelines | मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :

  • उन्हाळ्यात भरपूर प्यावे. तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे.
  • वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
  • नागरिकांनो घराबाहेर पडल्यावर ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा ज्यूस प्यावे.
  • उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला.
  • उन्हाळ्यात घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा.
  • तुमचे घराबाहेर काम असेल तर ऊन कमी झाल्यावर करावे.

हेही वाचा    –    संजोग वाघेरेंचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरोघरी जोरदार प्रचार 

या गोष्टी करू नका :

  • उन्हाळ्यात दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
  • दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर जाड वस्तू उचलू नका.
  • अनवाणी पायांनी बाहेर पडू नका.
  • अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावा.
  • घराभोवती हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळावे.
  • शिळे अन्न खाणे टाळावे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button