breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शालार्थ प्रणालीत पुन्हा अडचणी

  • शिक्षकांचे मे ते जुलैचे ऑफलाइन पगार काढण्याचे आदेश

पुणे – राज्यभरातील शिक्षकांचे पगार ज्या संगणक प्रणालीमधून होतात त्या संगणक प्रणालीमध्ये 12 जानेवारीपासून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अद्यापही ही प्रणाली सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन हे ऑफलाईन पध्दतीने काढण्यास अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. मे महिना ते जुलै महिन्याचे पगार देखील ऑफलाईन काढण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.
राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत 2 फेब्रुवारी व 23 फेब्रुवारी रोजी ऑफलाईन वेतन देण्यात आले होते. आता उर्वरित वेतनही ऑफलाईन पध्दतीनेच द्यावे अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच शालार्थ क्रमांक मिळूनही आतापर्यंत वेतन न मिळालेले शिक्षकही या ऑफलाईन वेतनास पात्र असणार आहे. शालार्थ प्रणाली दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांचे पगार आता ऑफलाईन करावेत अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button