breaking-newsक्रिडा

दिल्लीचा चेन्नईवर 34 धावांनी विजय

नवी दिल्ली – गोलंदाजांच्या प्रभावी कामगीरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचा 34 धावांनी पराभव करत मालीकेतील आपला चौथा विजय संपादीत केला. नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 162 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 6 गडी गमावून 128 धावांच करता आल्यने त्यांनी हा सामना गमावला.

Delhi Daredevils

@DelhiDaredevils

JEET GAYE BHAII!!!! 💪❤️

WE WIN BY 34 RUNS! 👏

आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अंबाती रायुडू आणि शेन वॉटसनने (14) चेन्नईला सावध सुरुवात करून दिली. सातव्या षटकात अमीत मिश्राने वॉटसनला बाद करत ही जोडी फोडली. यावेळी वॉटसन रायुडूने 7.1 षटकात 46 धावांची भागीदारी केली. वॉटसन बाद झाल्यानंतर रायुडूने वेगाने धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक झाल्या झाल्या तो बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जडेजाने अखेरच्या षटकांत प्रतिकाराचा अपूरा प्रय्त्न केला मात्र दिल्लीच्या गोलंदाजी समोर त्यांचा प्रयत्न तोकडा पडला.

IndianPremierLeague

@IPL

Match 52. It’s all over! Delhi Daredevils won by 34 runs http://bit.ly/IPL2018-52 

तत्पूर्वी, हर्षल पटेल आणि विजय शंकर यांच्या झंझावाती अखंडित भागीदारीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले होते. पृथ्वी शॉ केवळ 17 धावांवर बाद झाल्या नंतर श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी दुसऱ्या गड्यासाठी 6.2 षटकांत 54 धावांची भागीदारी करीत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंतने 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 22 चेंडूंत 3 चौकारांसह 19 धावा केल्या.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

IndianPremierLeague

@IPL

It’s all over here as the @DelhiDaredevils beat by 34 runs at the Kotla.

एन्गिडीने दोघांनाही एकाच षटकांत बाद करताना दिल्लीला हादरा दिला.त्यामुळे दिल्लीची 15 व्या षटकांत 5 बाद 97 अशी घसरगुंडी उडाली होती. मात्र हर्षल पटेल व विजय शंकर यांनी सहाव्या गड्यासाठी केवळ 5.2 षटकांत 65 धावांची झंझावाती भागीदारी करताना दिल्लीला 162 धावांची मजल मारून दिली. हर्षल पटेलने केवळ 16 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 36 धावा फटकावल्या. तर विजय शंकरने 28 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 36 धावा करून त्याला सुरेख साथ दिली. चेन्नईकडून एन्गिडीने 14 धावांत 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक-

दिल्ली डेअरडेव्हिल्स- 20 षटकांत 5 बाद 162 (ऋषभ पंत 38, श्रेयस अय्यर 19, विजय शंकर नाबाद 36, हर्षल पटेल नाबाद 36, एन्गिडी 14-2)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button