पुणेमहाराष्ट्र

मनपा हद्दीतील श्‍वानांची नसबंदी

पुणे  – दरवर्षी हजारो नागरिकांना रस्त्यावरील श्‍वानांकडून चावा घेतला जातो. ही संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी आता महापालिकेनेही उपाययोजना सुरु केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हजारो श्‍वानांची नसबंदी करण्यात येत असूनही श्‍वानांची संख्या काही कमी होत नाही. यावर मग आरोग्य विभागाने जालीम उपाय करत नसबंदी करण्यात येणा-या दोन केंद्रांवर निरीक्षक ठेवण्यासाठी दोन वैद्यकिय अधिका-यांची नियुक्ती केली आहे.
लवकरच शहरात श्‍वानांची गणना केली जाणार आहे. परंतु अधिका-यांच्या अंदाजानुसार मनपा भागात ही संख्या जवळपास दोन लाखांच्या घरात आहे. सध्या शहरात श्‍वानांची नसबंदी करण्यासाठी चार स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यांना नसबंदी करण्यासाठी प्रति श्‍वान साठ रुपयांचा खर्च महापालिकेकडून देण्यात येतो. श्‍वानांची नसबंदी महापालिकेच्या नायडू रुग्णालय आणि मुंढव्यातील ब्लू क्रॉस या दोन ठिकाणी केली जाते.
या संस्थांकडून ज्या श्‍वानांची नसबंदी झालेली नाही त्यांची शस्त्रक्रियेद्वारे वृषण काढून नसबंदी केली जाते. नसबंदीचा पुरावा म्हणून या वृषणांचा हिशोब या संस्थांकडून आरोग्य विभागाला दिला जातो. मात्र अनेकदा तेच ते वृषण दाखवून संस्था यामध्ये चुकीचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच या एकूणच प्रक्रियेवर आता नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नसबंदी न करता ती केली जात असल्याचा जो दावा संस्थांकडून होत होता त्यावर आता निरीक्षकांची नजर राहिल.

नसबंदी करण्यासाठी पुर्वीच्या संस्थांना तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या कॅनॉन केअर आणि रेस्न्यु या दोन संथ्सा मोफत नसबंदी करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांना टेंडरिंगद्वारे काम देण्यात येणार आहे. तसेच नसबंदीवर देखरेख करण्यासाठी नायडून रुग्णालय व मुंढव्यातील ब्लू क्रॉस येथे दोन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
डॉ.अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी
पुणे महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button