breaking-newsराष्ट्रिय
विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख विष्णू हरी दालमिया यांचे निधन
राम जन्मभूमी चळवळीतील महत्वाचे नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख विष्णू हरी दालमिया यांचे बुधवारी निधन झाले, ते ९१ वर्षांचे होते. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणूनही त्यांची ख्याती होती. आज संध्याकाळी त्यांच्यावर निगंबोध घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
वय झाल्यामुळे त्या अनुशंगाने होणाऱ्या विविध त्रासांमुळे दालमिया यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. १३ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून आपल्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यानंतर आज तीन दिवसांनंतर त्यांचे निधन झाले.
दालमिया हे श्री राम जन्मभूमी न्यासाचे ट्रस्टी तसेच विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडलचे सदस्य होते. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि गिरीराज किशोर यांच्यासोबत दालमिया यांनी राम जन्मभूमी चळवळीत महत्वाची भुमिका वठवली होती.