breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तीन वर्षापूर्वीच्या खूनाचा लागला छडा, दोन आरोपींना नागपूरातून अटक

पिंपरी, (महाईन्यूज) – अनोळखी व्यक्तीवर गोळ्या झाडून त्याचा खून करून पसार झालेल्या अट्टल दोन गुन्हेगारांना पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन गावठी कट्टे व 31 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी (दि. 6) युनिट 2 व तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

गुन्हेगारांनी 20 मे 2016 रोजी तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीच्या पोटात आणि डोक्यात गोळ्या झाडून खून करून आरोपी पसार झाले होते. पोलीस तपासात मयत व्यक्ती ओला कॅबचा ड्राईव्हर असून त्याचे नाव ज्ञानेश्वर किसन बरवटे असल्याची माहिती निष्पन्न झाली. गुन्हे शाखा युनिट 2 आणि तळेगाव पोलिसांनी सुत्रे हलवित संयुक्त तपासाला गती दिली. ज्ञानेश्वर ज्या कॅबवर चालक म्हणून काम करत होता. त्या गाडीची माहिती काढली असता ती गाडी खेड तालुक्यातील सावरदरी गावात असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता ते दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते नागपूर येथे आल्याचे समजले.

तळेगाव पोलीस आणि युनिट 2 च्या पोलिसांनी तत्काळ नागपूरला पथक रवाना केले. पोलिसांनी वैभव उर्फ पिंटू धनराज बिजेवार (वय 33, रा. रामदास पेठ, लेन्ड्रा पार्क) आणि दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय 25, रा. पाण्याच्या टाकीजवळ, मोशी अमरावती) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ देशी बनावटीचे गावठी कट्टे , ३१ जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाक जप्त करण्यात आले. सदर आरोपी यांनी ज्ञानेश्वर किसन वरबळे याचा खुन केला असून आरोपींनी मृताच्या एटीएममधुन १३ हजार ५०० रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button