breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या करणारा, अवघ्या 12 तासात कोठडीत

रायगड : रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या संतापजनक घटनेनतंर केवळ 12 तासात रायगड पोलिसांच्या वेगवेगळ्या आठ पथकांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली होती.

रविवारी (26 जुलै) संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान मृत तरुणी शेतात काम करणाऱ्या आजोबांना आणण्यासाठी गेली होती. मात्र 8 वाजून गेल्यानंतरही ती घरी न आल्याने आई, वडील आणि घरातील मंडळींनी शोधाशोध सुरु केली होती. यावेळी शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना स्कूटी उभी असलेली दिली आहे. मात्र ती मुलगी दिसली नाही. अन त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला असता, वोवाळ्याच्या कोडं या ओहळ्याच्या मध्यभागी एका मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र आणि मृत असल्याचे आढळले आहे.

यानंतर लगेचच कुटुंबियांनी रोहा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. या घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हा अधीक्षक सचिन गुजांळ, रोहा DYSP किरण सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी फॉरन्सिक लॅब आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाजवळ काही भौतिक पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर त्या मृत मुलीचे शव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

या गुन्ह्यांच्या तपासात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची आठ पथके बनवण्यात आली आहे. त्यानंतर घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील संशयितांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. त्यावेळी एका आरोपीने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. तसेच यात काही जणांचा सहभाग होता का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. पण अवघ्या 12 तासात एका आरोपीला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे मृत मुलीच्या घरी तसेच गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सदरच्या घटनेचे वृत्त समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करा, त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना दिले होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button