breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांचे समन्स, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी

मुंबई: दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ झालेली आहे. अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेला आहे. अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केलेला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केलेली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्याासाठी वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बाजावला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपला गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाचा खळबळजनक आरोप केला. नशेत अनुरागने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचं ट्वीट तिने केलं होते. वर्सोवा पोलीस ठाण्यात पायलने अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनुरागविरोधात कारवाई केली नाही तर उपोषण करेन, असा इशाराही पायल घोषने दिलेला होता. 19 सप्टेंबरला पायलने ट्वीट करून अनुरागवर आरोप केलेले होते. 22 सप्टेंबरला तिनं वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button