breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

पेट्रोलचा दर पुन्हा वाढवला, ग्राहकांच्या खिशाला बसली कात्री

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असल्याने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेल दर मागील कित्येक दिवस जैसे थे होते. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल दरवाढ केली. काल पेट्रोल दरात सरासरी १२ पैशांची वाढ केली होती.तर, आज पुन्हा पेट्रोल दरात १४ ते १६ पैशांची वाढ झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. तर पेट्रोलचा दर वाढवला. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.४५ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.७३ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.८७ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.३० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे.

अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button