breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोध डावलून सोशल मीडियाच्या विषयाला स्थायीची मान्यता, विरोधकांची आगपाखड

  • केवळ व्यक्तीचे नाव वगळल्याचा आक्षेप
  • परंतु, सभापती हा विषय रद्द करणार ?

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील कल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करण्यासाठी ”सोशल मीडिया एक्सपर्ट” नेमणुकीच्या विषयाला स्थायी समितीने अखेर आज मान्यता दिली. या विषयावरून विरोधक, सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात मत मतांतरे होती. त्यामुळे दीड वर्षांपासून रखडलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. परंतु, त्याला विरोधकांनी स्थायीच्या सभेत कडाडून विरोध दर्षविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कल्याणकारी योजना, नागरिकांच्या दृष्टीने हितकारक उपक्रम तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया एक्सपर्टची नेमणूक करण्याचा ठराव स्थायी समितीने दीड वर्षापूर्वी मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, पालिका प्रशासनातील तज्ञ अधिकारी आणि कर्मचा-यांची कुमक असताना सोशल मीडियाचे हे नाटक कशासाठी असा सवाल करत विरोधकांनी हा विषय तहकूब करण्यास सत्ताधारी भाजपला भाग पाडले होते. त्यावर हा विषय पुन्हा गेल्या दोन स्थायी समितीच्या सभांमध्ये चांगलाच गाजला होता.

विरोधकांचा या विषयाला विरोध असताना हा ठराव दुरूस्त करून पुन्हा स्थायीने मान्यतेसाठी आजच्या सभेपुढे घेतला. केवळ सोशल मीडिया एक्सपर्ट म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचे नाव वगळून जसाच्या तसा ठराव स्थायीने पुढे आणला आहे, असा आक्षेप घेऊन विरोधकांनी सभापती विलास मडिगेरी यांनी विषयाला दिलेल्या मंजुरीला विरोध दर्षविला. जर, विषयात आक्षेपार्ह काही आढळल्यास हा ठराव रद्द करण्यात येईल. ठराव रद्द करण्याचे अधिकार सभापती म्हणून आपल्याला प्राप्त आहेत, असे स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी पत्रकारांना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button