breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पैसे

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकार शेतकऱ्यांना दहावा हप्ता देणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने पीएम किसान सन्मान निधी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिवर्षी चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा केले जात आहेत.

१ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान देखील जारी करणार आहेत. तुम्ही या कार्यक्रमाशी दूरदर्शन किंवा pmindiawebcast.nic.in द्वारे कनेक्ट होऊ शकता. असा एक मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी (Farmers) e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तरच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 10 व्या हप्त्याचे लाभ मिळणार आहेत. तसेच, या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.

… तर मिळणार ४ हजार रुपये

शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4 हजार रुपये ट्रान्सफर होतील. पण ही सुविधा केवळ त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केलीय.
ई-केवायसी प्रक्रिया?

– सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

– उजव्या बाजूला अनेक प्रकारचे टॅब दिसतील.

– सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल.

– त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर मागितलेले तपशील भरुन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा

पात्र शेतकरी कसे करतील नोंदणी –

– शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

– त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा.

– याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

– याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका.

– कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल.

– तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल.

– ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button