breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्‍यार्थ्‍यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्‍यावा – अमित गोरखे

  • कासारवाडीत १२० विद्‍यार्थ्‍यांचा गुणगौरव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – विद्‍यार्थ्‍यांनी आपल्‍या उच्‍च शिक्षणामध्‍ये विविध शासकीय योजनांचा लाभ घ्‍यावा, प्रत्‍येकाने आपल करियर उत्‍तम घडवा, असे मत आण्‍णाभाऊ साठे महामंडळाचे अध्‍यक्ष अमित गोरखे यांनी केले.

कासारवाडी येथील सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने दहावी-बारावीच्‍या परीक्षेमध्‍ये विशेष प्राविण्‍य मिळविलेल्‍या १२० विद्‍यार्थ्‍यांचा गुणगौरव करण्‍यात आला. शालेय उपयोगी साहित्य वाटप केले. यशप्राप्‍त विद्‍यार्थ्‍यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी या हेतुने गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे भाजप युवा मोर्चाचे उपाध्‍यक्ष गणेश जवळकर यांनी सांगितले.

यावेळी राजेश पिल्ले, प्रकाश जवळकर, नगरसेवक माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, कुणाल लांडगे, संजय कणसे, नगरसेविका आशा शेंडगे, वैशाली खाडेय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  प्रा. शंकर आथारे यांनी विद्यार्थ्यांचे करिअर विषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी-पालक मोठ्‍या संख्‍येने उपस्‍थित होते. अमोल जाधव यांनी सूत्रसंचलन केले. अनुप मोरे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button