breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश; महापाैरांसह नगरसेवकांचा निषेध

  • टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीकडून पत्रकाद्वारे केला निषेध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, मजुरांनी स्वताःच्या उदरनिर्वाहासाठी हातगाडे, टपरी चालवित आहेत. मात्र, महापालिकेच्या महासभेत एका परप्रांतिय फेरीवाल्याने नगरसेवकाविरोधात तक्रार दिली, त्याची शिक्षा म्हणून शहरातील सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापाैर राहूल जाधव यांनी दिले. तसेच काही नगरसेवकांनी फेरीवाले हटाव ही भूमिका घेतली. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने महापाैरांसह विरोध करणा-या नगरसेवकांचा प्रसिध्दपत्रकांद्वारे निषेध केला आहे.

टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने दिलेल्या प्रसिध्दपत्रकांत म्हटले आहे की, केंद्र, राज्य सरकारने टपरी, पथारी, हातगाडी धारकांसाठी कायदा करुन हाॅकर्स झोन निर्मितीचे आदेश दिले आहेत. परंतू, पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतंत्र उपनिधी मंजुर केला. फेरीवाल्याचा बायोमेट्रीक सर्व्हे करुन त्याना परवाने देखील वाटप केले आहेत.

वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने त्याचे पर्यायी ठिकाणी पुनर्वसन केले पाहिजे. त्यावर फेरीवाल्यांना हटवून कारवाई करणे योग्य नाही. महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी अद्यापही हाॅकर्स झोन निर्माण केले नाहीत. शहरातील फेरीवाल्यांचे कायद्याद्वारे पुनर्वसन करण्यात यावे, याकरिता तिन्ही आमदार आणि खासदारांची भेट घेवून निवेदन देणार आहे.

दरम्यान, गोरगरीब, कष्टकरी फेरीवाल्यावर कारवाईचे आदेश देणा-या महापाैर राहूल जाधव, आणि फेरीवाला हटाव भूमिका घेणा-या नगरसेवकांचा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे सचिव प्रल्हाद कांबळे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button