breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कार्तिकी एकादशीला अजित पवार महापूजेसाठी पंढरपपूरला जाणार

पुणे – राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपुरात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये नाराजी पसरली असून उपमुख्यमंत्र्यांनीही घरातून विठ्ठलाची पूजा करावी असा नाराजीचा सूर वारकऱ्यांनी लावला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरला जाणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, अजित पवार पंढरपुरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. त्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आपण आणि दिलीप वळसे पाटील यांनी एवढी काळजी घेतली तरीही कोरोना झाला. त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आषाढीवारीनंतर आता कार्तिक वारीसाठीही आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. कोरोनाची लस शोधण्याचं काम सुरु आहे. सिरमसारख्या संस्था त्यावर काम करत आहेत. राज्यातील सर्व लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार तयारी करत असल्याची माहितीही अजितदादांनी दिली. असं असलं तरी कुणीही गाफिल राहू नका, योग्य खबरदारी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे. अजितदादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button