breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध मागण्यासाठी रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बेमुदत संप

– पुण्यातील मेळाव्यात एकमताने निर्णय
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्रातील रिक्षाचालक, मालकांच्या विविध मागण्यासाठी 9 जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. अशी माहिती कृती समिती सरचिटणीस व रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची भूमिका ठरवण्यासाठी पुणे येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम सभागृहात रविवारी (दि.16) बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्यव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून, 30 जून पर्यंत रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याचे मुदत देण्यात आली आहे. अन्यथा, 9 जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
या बैठकीस मार्गदर्शन करताना कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव म्हणाले की, रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, ३० जूनपर्यंत हे सर्व प्रश्न सोडवावेत, या बाबत मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना निवेदन दिले आहे. अन्यथा ९ जुलैपासून बेमुदत संप करण्यात येईल.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांच्या मागण्या सरकारने सोडवल्या नाही. यामुळे रिक्षा चालकांमध्ये तीव्र संताप आहे. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मधील सर्व रिक्षा चालक संपत सहभागी होतील.
या आहेत रिक्षा चालक-मालकांच्या मागण्या…
 महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करा.
 ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
 ऑटोरिक्षाचे थर्ड पार्टी इन्शुरन्स दर तात्काळ कमी करा.
 ऑटोरिक्षा व टॅक्सी व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या ओला -ऊबेरवर कार्यवाही करुन त्या ओला-ऊबेरला हद्दपार करा
 राज्यातील अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कार्यवाही करा
 ऑटोरिक्षा चालकास  पब्लिक सर्वन्ट हा  दर्जा देण्यात यावे,
राज्यातील जिल्हास्तरीय RTO च्या समितीवर एक अशासकीय सदस्य म्हणून एक ऑटोरिक्षा चालकास प्रतिनिधित्व देण्यात यावे.
मेळाव्यात कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे,उपाध्यक्ष  मारुती कोंडे, प्रमोद घोणे , विजय पाटील , पुणे जिल्हा अध्यक्ष आणि शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष  अशोक साळेकर,पुणे फेडरेशन अध्यक्ष  बाबा शिंदे , पर्यदर्शनी रिक्षा संघटना अध्यक्ष  आनंद तांबे , शिवाजी नगर एस टी स्टॅन्ड अध्यक्ष दत्ता पाटील , राष्ट्रवादी रिक्षा संघटना अध्यक्ष विजय रवळे , सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव , पुणे स्टेशन रिक्षा संघटना अध्यक्ष सुरेश जगताप , श्री सेवा रिक्षा संघटना अध्यक्ष ठकसेन पोहरे, पि आशिर्वाद रिक्षा संघटना अध्यक्ष  अनिल यादव , पुणे कॅन्टोमेन्ट रिक्षा संघटनेचे साई मोटाडू ,  महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राजू शिदगणे,  लखन लोंढे , सोमनाथ कलाटे , सम्राट मुंडे , आरिफ पठाण , आदी उपस्थित होते   शिला डावरे ,  प्रकाश झाडे ,  चंद्रकांत गोडबोले , आबा बाबर, यांनी मनोगत व्यक्त केले.  अशोक साळेकर , यांनी प्रस्थाविक केले , दत्ता पाटील यांनी आभार मानले,
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button