breaking-newsराष्ट्रिय

वाचा काय म्हणाले भाजपचे खासदार #MeToo मोहिमेबाबत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘१० वर्षांपूर्वी आपल्याबरोबर अश्लील वर्तणूक केल्याचा’ आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता देशभरातून अनेक अभिनेत्र्यांनी व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी आपण देखील कशा प्रकारे लैंगिक अत्याचारांचे बळी ठरलो होतो याबाबत सोशल मीडियावरून व्यक्त होयला सुरुवात केली आहे. आता #MeToo या मोहिमेबाबत  भाजपाचे खासदार उदित राज यांनी आपले मत मांडले आहे.

उदित राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून भारतातील #MeToo मोहिमेला ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे त्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत उदित राज लिहतात की “#MeToo मोहीम नक्कीच गरजेची आहे मात्र जर अशा प्रकारे कोणी दहा वर्षांनंतर तक्रार करणार असेल तर त्या घटनेची चौकशी कशी केली जाणार? तसेच जर कोणी एखाद्या पुरुषावर अशा प्रकारचे खोटारडा आरोप लावले तर त्याच्या प्रतिमेस किती मोठ्या प्रमाणात ठेच पोहचेल याचा विचार करणे देखील गरजेचे आहे. भारतात #MeToo मोहिमेस पडलेला पायंडा हा चुकीचा आहे.”

Dr. Udit Raj, MP

@Dr_Uditraj

जरूरी है लेकिन किसी व्यक्ति पर 10 साल बाद यौन शोषण का आरोप लगाने का क्या मतलब है ? इतने सालों बाद ऐसे मामले की सत्यता की जाँच कैसे हो सकेगा?जिस व्यक्ति पर झूठा आरोप लगा दिया जाएगा उसकी छवि का कितना बड़ा नुकशान होगा ये सोचने वाली बात है।गलत प्रथा की शुरुआत है।

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button