breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशाच्या उभारणीत नौदलाचे योगदान मोठे- राष्ट्रपती

पणजी |

संकटकाळात अनेक वेळा सागरी तैनाती करून भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील अग्रक्रमाच्या भागीदाराचा व्यापक दृष्टिकोन पूर्ण करण्यावर भर दिला आहे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींनी येथील आस्थापनास ‘प्रेसिडेंटस कलर टू दी इंडियन नॅव्हल अ‍ॅव्हीएशन’ प्रदान करताना  हे मत व्यक्त केले असून ते म्हणाले की, भारतीय नौदलाने संकटकाळात तैनाती करून नेहमीच चांगली कामगिरी केली असून हिंदी महासागरातील अनुकूल भागीदाराचे स्थान मिळवले आहे.

‘आयएनएस हंस’ (वास्को) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. तेथे त्यांनी भारतीय नौदलाची सलामी स्वीकारली. कोविंद हे तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून त्यांनी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांच्या उपस्थितीत ‘प्रेसिडेंटस कलर टू दी इंडियन नॅव्हल अ‍ॅव्हीएशन’ प्रदान  केले. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. प्रेसिडेंटस कलर सन्मान  हा देशासाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या विभागांना प्रदान करण्यात येतो.

कोविंद यांनी सांगितले की, भारतीय नौदलाने सर्व महत्त्वाच्या प्रादेशिक गोष्टींची वचनबद्धता पूर्ण केली असून त्यामुळे मित्र देशांशी राजनैतिक सहकार्य वाढवण्यास मदत झाली असून भारत हा हिंद प्रशांत क्षेत्रात महत्त्वाचा भागीदार देश ठरला आहे. ऑपरेशन समुद्र सेतू, मिशन सागर यासारख्या मोहिमा राबवण्यात नौदलाने महत्त्वाची कामगिरी केली असून कोविड काळात हिंदी महासागरातील भागीदार देशांना तसेच इतर शेजारी देशांना मदत करण्यात मोलाची  भूमिका पार पाडली आहे. संकटाच्या काळात भारतीय नौदलाची वेगाने होणारी तैनाती हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याने भारत हा महत्त्वाचा भागीदार देश ठरला आहे.

  • आत्मनिर्भरता आणि महिलांचा सहभाग

राष्ट्रपती म्हणाले की, भारतीय नौदलाने देशीकरणावरही भर देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली असून नौदलाच्या सध्याच्या व आगामी अधिग्रहण योजनांचा त्यात समावेश आहे. आत्मनिर्भर भारतात नौदलाचे मोठे योगदान आहे. मेक इन इंडियावरही  भर देण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय नौदलात १५० हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी असून त्यातील पन्नास टक्के म्हणजे ८४ अधिकारी या महिला आहेत. निरीक्षकांची संख्या ४०० असून त्यात ७५ महिला आहेत. महिला वैमानिकांचाही समावेश भारतीय नौदलाच्या हवाई सेवेने केला आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button