breaking-news
वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली
वर्धा | महाईन्यूज
शहरातील मुख्य बाजारपेठेत दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल १.४० लाखांची रोख तर ज्वेलरीच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतलेली आहे.