breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : लावणी तृत्यांगण गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता राज्य महिला आयोगाने याची देखल घेतली आहे.

महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असं रूपाल चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button