breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपा निष्ठावंत एकनाथ पवार यांची ‘लाभ’दायी स्थायी समितीवर संधी?

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगेंकडून ‘ग्रीन सिग्नल’?

भाजपा प्रदेशपातळीवरही एकनाथ पवार यांची ‘फिल्डिंग’

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका  सभागृहातील सत्तारुढ पक्षनेता पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता एकनाथ पवार यांची महापालिका स्थायी समितीवर निवड होणार, अशी चर्चा रंगली आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी विद्यामान स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्याजागी पवार यांना संधी दिली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक बदल झाल्यानंतर शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी निष्ठावंत, नवे-जुने अशा सर्व गटांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मिळते-जुळते घेण्यास सुरूवात केली.

राजीनामा दिल्यानंतर एकनाथ पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसेच, पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील, ती स्वीकारणार आहे, असेही म्हटले आहे. विशेष म्हणजे, महापालिका निर्णय प्रक्रियेत दोन्ही आमदार सहभागी करुन घेत नाहीत. त्यामुळे नाराजीतून हा राजीनामा दिला, असा सूर दबक्या आवाजात महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर ऐकायला मिळत होता. मात्र, स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीकरीता पवार यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही भूमिका घेतली असावी, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.

एकनाथ पवार म्हणजे शहर भाजपाचा एकाकी ‘योद्धा’…

दरम्यान, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि एकनाथ पवार यांनी बैठक झाली. तसेच प्रदेश पातळीवरही पवार यांना पक्षश्रेष्ठींनी ‘शब्द’ दिला आहे, असे बोलले जाते. गेल्या तीन वर्षांत सत्तारुढ पक्षनेते म्हणून एकनाथ पवार यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपासाठी ‘ एकाकी योद्धा’च्या भूमिकेत दिसले आहेत. विरोधी बाकावरील प्रत्येक नगरसेवकाच्या टीकेचे धनी झालेल्या पवार यांनी आपला संयम सोडला नाही. महापालिकेच्या गडावर सत्ता असतानाही पक्षातील मतभेदांमुळे पवार यांना कायम संघर्ष करावा लागला. सत्तारुढ पक्षनेतेपद लाभाचे मुळीच नव्‍हते. पण, त्यामुळे दोन आमदारांमधील समन्वय ठेवणे आणि महापालिका सभागृह चालवण्यासाठी पवार यांना तारेवरची कसरत करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे.  मात्र, स्थानिक राजकारणात एकाकी पडलेल्या एकनाथ पवार यांना प्रदेशपातळीवर पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभापतीपदी पवार यांना संधी मिळणार आहे. त्यासाठी पवार यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत करुन राजीनामा दिला,  असा अंदाज वर्तवला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button